सांगावा

आजवर मित्रांसोबत बोलताना तु अजुन ‘रायगड’ ला नाही गेलास हे हेटाळणीच वाक्य खुप जणांकडून ऐकून होतो, प्रत्येक वाक्यागणिक मनाला टोचणी वाढत जायची. त्या आधिही भरपुर वेळा ‘रायगड’ वारी हुकलेली होती पण नक्की माहीत होत धनी जेव्हा बोलवेल तेव्हा जावच लागेल. गेल्या कित्येक दिवसांची मनातली इच्छा आज पुर्ण होतेय. धन्याचा सांगावा आलाय !!!

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुड़ीपाडव्याच्या शुभ मुहूर्तवार नविन वर्षाच्या भटकंतीची सुरवात आज रायगडवारी ने करतोय…..

बाकीच्यांच् तर माहीत नाही पण माझ्यासाठी तरी हे वर्ष भटकंतीमय जाणार आहे हे नक्की !!!!!

Advertisements

मळभ

गेल्या जानेवारी मधे AMK झाला आणि त्या नंतर भटकंती बंदच झाली, शरीर भटकंतीसाठी तयार असलं तरी मन अजुन उंबरयाबाहेर पाऊल टाकायला नाही म्हणते. का ते माहीत नाही पण एक प्रकारच मळभ दाटलय, सुन्न करणारी काजळी पसरलिये. एखाद्या चक्रव्युवहात अड़कल्यासारख झालोय जिथे आत तर शिरलो पण अजुन बाहेर पडण्याचा मार्ग गवसत नाहिये. नुसता भिरभिर फिरतोय बाहेर पडण्यासाठी…….
याला एकच उपाय पुन्हा ‘सह्याद्री’ कालातीत गुरुला शरण जाणे, आता तोच एक आहे जो हे मळभ सारुन स्वच्छ सुर्यप्रकाशासारखं मन मोकळ करेल, योग्य मार्गाला लावेल

image